देवगड जामसंडे शहरातील नागरिक ऐन पावसाळ्यात तहानेने व्याकुळ!

एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याची वलग्ना करणारे आता गप्प का ?

देवगड,दि. १५ जून(दयानंद मांगले)

देवगड वासियांवर वरुण राजा कृपा करीत असताना १०७८मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असली तरी देवगड वासियांना मराविवी कंपनीच्या सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे व नगरपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे देवगड वासीय अजूनही ऐन पावसाळ्यात तहानेने व्याकुळ व्हावे लागले आहे.एरव्ही एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याची वलग्ना करणारे देवगड वासीयांना ४ ते ५ दिवस आड पाणी पुरवठा होत असताना गप्प का आहेत.याला जबाबदार कोण?प्रशासन की स्थानिक लोकप्रतिनिधी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
देवगड जामसंडे शहराला पाणीपुरवठा कशा पद्धतीने होणार आहे याचे प्रभागनिहाय ,वाडीनिहाय पाणी नियोजन वेळापत्रक ग्रुप वर टाकले जाते.एन उन्हाळ्यात वारंवार पाईप फुटत असताना पाणी पुरवठा अनियमित कमी जास्त प्रमाणात होत होता तसे फोटो मेसेज ग्रुप वर तात्काळ पडत होते. आता पावसाळ्यात पंपिंग स्टेशन येथील नियमित खंडित असणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे पाणी साठा होत नाही असे मेसेज ग्रुप वर फिरू लागले आहेत.असे असले तरी दहीबाव येथील वीजपुरवठा
खंडित होतो व व पुरेसा पाणी साठा साठवण टाकीत पडत नाही त्यावेळी शिरगाव पाडागर येथून पाणीपुरवठा का केला जात नाही हेही न उलगडणारे कोडे आहे.कोलमडले पाणी वाटप नियोजना मुळे देवगड वासीय ऐन पावसाळ्यातही पुरेसा व वेळेत पाणी पुरवठा होण्याची फक्त स्वप्नं पाहत आहेत.