मालवण,दि. १५ जून
महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे एप्रिल 2025 मध्ये घेण्यात आलेल्या गणित प्रज्ञा परीक्षेत अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई संचालित डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग या प्रशालेतील इयत्ता पाचवी मध्ये शिकत असणारा विद्यार्थी कुमार गंधार दत्तप्रसाद तेंडोलकर याने गणित प्रज्ञा परीक्षेत राज्यस्तरीय सिल्वर कॅटेगरीत प्रमाणपत्र मिळवून यश संपादन केले. त्याला प्रशालेच्या शिक्षिका सौ. पाटणे मॅडम यांचे आणि ज्येष्ठ शिक्षक श्री. विवेक गोसावी सर तसेच सदर विद्यार्थ्यांच्या पालकांचे देखील मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. खोबरेकर मॅडम संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.