“जय भवानी, जय शिवाजी..!!”च्या जयघोषात सावंतवाडी भगवामय…

सावंतवाडी,दि.१९ फेब्रुवारी
“जय जय जय शिवाजी, जय जय जय भवानी..!!”च्या जयघोषात स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या शिवरॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी या रॅलीमध्ये युवाई मोठ्या उत्साहाने सामील झाली होती. तर दुसरीकडे चिमुकल्यांची मोठी संख्या होती. या रॅलीचा शुभारंभ सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले यांच्याहस्ते करण्यात आले. तत्पुर्वी श्री देव पाटेकराला सर्वांनी नमस्कार करुन रॅलीला सुरुवात केली.
यावेळी छत्रपतींचा जाज्वंल इतिहास तेवत ठेवण्यासाठी स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून घातलेला पायंडा असाच सुरू रहावा, असे आवाहन श्री. खेमसावंत भोसले यांनी केले. दरवर्षी प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त येथील राजवाड्यातून ही रॅली काढण्यात आली. तत्पुर्वी त्या ठिकाणी आलेल्या सर्व तरुण तरुणींसह लहान मुलांना भगवे फेटे परिधान करण्यात आले. त्यानंतर खेमसावंत यांच्याहस्ते या रॅलीला सुरुवात करण्यात आली.
यावेळी सावंतवाडी संस्थानच्या राणी शुभदादेवी भोसले, युवराज लखमराजे भोसल, युवराज्ञी श्रध्दाराणी भोसले, अ‍ॅड. बापु गव्हाणकर, माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी महेश पांचाळ, राजू कासकर, महेंद्र सांगेलकर, दिलीप भालेकर, अमोल साटेलकर, दिनेश गावडे, कृष्णा धुळपणावर, अमेय मोरे, सुशांत पाटणकर, प्रमोद तावडे, बाळु पार्सेकर, समीर सावंत, नंदू डकरे, कॉंग्रेसच्या साक्षी वंजारी, राष्ट्रवादीच्या महिला नेत्या अर्चना घारे, परशुराम चलवादी, निलिमा चलवादी, अंकीत तेंडोलकर, सचिन कुलकर्णी, देव्या सुर्याजी, अनिष माटेकर, संजू शिरोडकर, नंदू पोकळे, अमित वेंगुर्लेकर, संदिप सावंत, अमोल टाकरे, संजय पार्सेकर, निलेश कदम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.