नांदगावातील सर्व्हिस रोडवरील खड्डे बुजवा

…अन्यथा खड्डयांमध्ये वृक्षारोपण करणार, नांदगाव सन्मित्र रिक्षा संघटनेचा इशारा

कणकवली दि.१७ जून 

नांदगाव तिठा येथील सर्व्हिस रोडवर खड्डे पडले आहे. खड्डयांमुळे रोडवरून ये-जा करणे वाहनचालकांसह नारिकांनी अवघड झाले. येत्या दोन दिवसांत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने रस्त्यावरील खड्डे न बुजवल्या शनिवार २१ रोजी सकाळी १० वा. खड्डयांमध्ये वृक्षारोपण करणार, असा इशारा नांदगाव सन्मित्र रिक्षा संघटनेने दिला आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव तिठा हा महत्त्वाचा भाग आहे. या तिठ्यावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. नांदगाव तिठ्यावरून देवगड-निपाणी राज्य महामार्ग मध्य भागातून गेलेला आहे. तिठा येथील सर्व्हिस रोडवर खड्डे पडले आहेत. त्याचा फटका वाहनधारक यांना बसत आहे. खड्डयांमुळे दुचाकीस्वार पडून जखमी झाले आहेत. येत्या दोन दिवसांत संबंधित विभागाने खड्डे न बुजवल्यास केल्यास २१ जून रोजी सकाळी १० वा. खड्ड्यांत वृक्षारोपण करून महामार्ग प्राधिकरणचा निषेध करण्यात येणार, असा इशारा रिक्षा संघटनेने दिला आहे