सावंतवाडी दि.१९ फेब्रुवारी
ना .दीपक केसरकर मित्र मंडळ व सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघ यांनी सावंतवाडी येथे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय हस्ताक्षर सुधार कार्यशाळे नंतर प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांसाठी हस्ताक्षर सुधार उपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या तालुकास्तरीय हस्ताक्षर सुधार उपक्रम स्पर्धेत जिल्हा परिषद केंद्र शाळा मळेवाड नंबर एकचे शिक्षक संजय कृष्णा बांबुळकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला
सुरेखा परब जिल्हा परिषद शाळा कोळगाव नंबर दोन, रंगनाथ चंद्रकांत परब जिल्हा परिषद शाळा बांदा नंबर एक ,सौ नीता नितीन सावंत शिरशिंगे शाळा नंबर 1 व मानसी निलेश परुळेकर विद्याविहार इंग्लिश स्कूल आजगाव यांनी क्रमांक पटकावले.
लुईस गोन्सालवीस (बांदा),संत तुकाराम राणे (आरोस धनगरवाडी) व राजेश आजगावकर ( इन्सुली हायस्कूल) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविले . तालुक्यातील १४ शिक्षकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षर स्पर्धेत नम्रता प्रकाश जाधव युनियन इंग्लिश स्कूल आंबोली हिने प्रथम क्रमांक मिळवला तर विनेश मोरे भैरववाडी कारीवडे, आर्यन नारायण बोभाटे सैनिक स्कूल आंबोली, साक्षी सुनील नाईक मळेवाड नंबर एक, वेदांत विरोचन राऊळ कोलगाव नंबर दोन यांनी क्रमांक मिळवले
या स्पर्धेत २२ शाळा सहभागी झाल्या होत्या स्पर्धेचे परीक्षण विकास गोवेकर यांनी केले यशस्वी शिक्षक व विद्यार्थ्यांचा गुणगौरव दि.२५ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता गव्हाणकर कॉलेज सावंतवाडी येथे मराठी दिनाचे औचित्य साधून होणाऱ्या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत केला जाणार आहे अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघाचे कार्याध्यक्ष भरत गावडे यांनी दिली हे दोन्ही उपक्रम राबविण्यासाठी दीपक केसरकर मित्रमंडळाचे अध्यक्ष राजन पोकळे आबा केसरकर नंदू शिरोडकर गट शिक्षणाधिकारी कल्पना बोडके महेंद्र चव्हाण व सर्व केंद्रप्रमुख यांचे सहकार्य लाभले असल्याचे सांगण्यात आले.