शिवसेने तर्फे आचरा येथे शिवजयंती उत्साहात

आचरा, दि.१९ फेब्रुवारी(अर्जुन बापर्डेकर)
शिवसेना तर्फे आचरा येथे आयोजित शिवजयंती उत्सवात बालगोपाल मंडळ आचरा वरचीवाडीने सादर केलेल्या दिंडी भजनाने अवघे वातावरण शिवमय बनले होते ‌या सोहळ्याची सुरुवात सकाळी शिवसेना तालुका प्रमुख महेश राणे ,आचरा सरपंच जेरान फर्नांडिस यांच्या हस्ते शिवाजी महाराज प्रतिमा पुजनाने झाली.यावेळी उपसरपंच संतोष मिराशी, चंद्रकांत गोलतकर, महेंद्र घाडी,अवधूत हळदणकर,चंदू कदम अश्विन हळदणकर यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते. यावेळी संदेश रावले आणि सहकारया़ंनी सादर केलेल्या कराओके गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.