छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास तरुणांनी आत्मसात करावा – रुजाय फर्नांडिस

कळसुली जि.प.शाळा नं.१ येथे शिवजयंती उत्साहात साजरी

कणकवली,दि.१९ फेब्रुवारी
छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने रयतेचे राजा होते.छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आज तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज आहे. शिवरायांची निती, जिजाऊंचे संस्कार व शिवरायांचे संघर्ष या सर्व बाबी बारकाईने समजावून शिवशाही अंमलांत आणणे काळाची गरज आहे,असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नांडिस यांनी केले.

कळसुली जि.प.शाळा नं.१ येथे शिव जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी रुजाय फर्नांडिस यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापिका राधिका कवडे , विलीस चोडणेकर,वृषाली बागवे , चित्रा मेस्त्री,प्रिती पारधीये, रिया दळवी, विना देसाई, श्रीया दळवी आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना रुजाय फर्नांडिस म्हणाले की,शिवाजी महाराजांचा संघर्ष हा कुठला जात व धर्म संघर्ष नव्हता. तर शिवाजी महाराजांचा संघर्ष रयतेच्या राज्यासाठी होता. शिवराय सर्व जाती धर्माचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या स्वराज्यात जाती धर्माला थारा नव्हता.त्यांचा आदर्श प्रत्येकांनी घ्यावा.असे फर्नांडिस म्हणाले.

मुख्याध्यापिका राधिका कवडे मार्गदर्शन करताना म्हणाल्या की,
छत्रपती शिवाजी महाराज प्रजेवर मुलाप्रमाणे प्रेम करणारे राजे होते. स्वराज्याची शपथ घेऊन स्वांतत्र्य स्वराज्य निर्माण करणारे रयतेचे राजे होते.महारांजाचा हा आदर्श आपण घेतला पाहिजे .असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी वेशभूषा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीरंग दळवी, द्वितीय क्रमांक मनस्वी दळवी, तृतीय क्रमांक ध्रुवी देसाई, यांनी मिळविला. वेशभूषा स्पर्धेतील विद्यार्थ्यांना रुजाय फर्नांडिस पुरस्कृत ट्रॉफी व भेट वस्तू व सहभागी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू व खाऊ देण्यात आले.

मुख्याध्यापीका राधिका कवडे यांनी शाळेच्या वतीने रुजाय फर्नांडिस यांचे आभार मानले.यावेळी विद्यार्थी, पालक उपस्थित होते.