मसुरे कावावाडी येथे १ मार्च रोजी पेडणेकर बंधू निवासस्थानी मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

 मालवण,दि.१९ फेब्रुवारी

श्रीमती जयश्री रावजी पेडणेकर सेवा टस्ट, पेडणेकर बंधू कावावाडी व विजय क्रीडा मंडळ, मुंबई यांच्यातर्फे १ मार्च रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २ या वेळेत मसुरे कावावाडी येथील पेडणेकर बंधू निवासस्थान येथे मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी मोफत चष्मा वाटप करण्यात येणार आहे. गावातील ग्रामस्थ, महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन जयश्री रावजी पेडणेकर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष शरद पेडणेकर आणि पेडणेकर बंधूतर्फे करण्यात आले आहे