शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे शिवजयंती साजरी

‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणाबाजी

कणकवली दि.१९ फेब्रुवारी(भगवान लोके)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात शिवजयंती साजरी करण्यात आली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणाबाजी शिवप्रेमींनी केली.

यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, शहरप्रमुख प्रमोद मसुरकर, उद्योजक रामदास विखाळे, माजी जि. प. सदस्या स्वरुपा विखाळे, वैदेही गुडेकर, दिव्या साळगावकर, माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर,कन्हैया पारकर, प्रसाद अंधारी, कलमठचे माजी सरपंच निसार शेख, एसटी कामगार सेनेचे तालुकाप्रमुख वैभव मालंडकर, राजू राठोड, विलास गुडेकर, रुपेश आमडोसकर, संतोष गुरव, सचिन आचरेकर, सोहम वाळके, बाबू कोरगावकर, निसार खान, सोमा गायकवाड,चेतन मुंज,संदीप कांबळी, यांच्यासह शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.