लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी लोकसभा प्रवास योजना मधून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये भाजपच्या बैठका होणार

सावंतवाडी,दि.१९ फेब्रुवारी 
लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी लोकसभा प्रवास योजना मधून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये भाजपच्या बैठका होणार आहेत. येत्या दि.२५ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी मध्ये सभा होणार आहे. यावेळी
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती जिल्हा महिला अध्यक्षा सौ श्वेता क़ोरगावकर व भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी दिली.
भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सौ श्वेता क़ोरगावकर व महेश सारंग यांनी माहिती दिली. यावेळी सौ प्राजक्ता केळुसकर, रूपाली शिरसाट,मिसबा शेख, बांदा मंडळ अध्यक्ष महेश धुरी, आंबोली मंडळ अध्यक्ष रवींद्र मडगावकर व अशोक सावंत उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गट निहाय महिलांची संघटना बांधणी करण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी असावेत म्हणून देशभर महिला सक्रिय झाल्या आहे त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हाही आघाडीवर राहील असे सौ श्वेता कोरगावकर यांनी सांगितले .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळामध्ये गर्भातील मुलापासून वयोवृद्ध महिला आणि पुरुषांची काळजी घेणाऱ्या योजना राबवल्या आहेत त्या आम्ही जनतेपर्यंत नेत आहोत प्रत्येक बुथवर मतदारसंघांमध्ये महिलांची संघटना बांधून महिलांचे गटण एकगठ्ठा मतांसाठी केले जात आहे प्रत्येक बुथवर कार्यकारणी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सौ श्वेता कोरगावकर यांनी दिली
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश सारंग म्हणाले, लोकसभा प्रवास योजनेच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सावंतवाडी मध्ये भाजपच्या मान्यवर नेत्यांची बैठक होत आहे. येत्या २५ फेब्रुवारी रोजी सावंतवाडी मध्ये भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, केंद्रीय मंत्री नारायण राणे ,पालकमंत्री रवींद्र चव्हाण ,भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आदींची बैठक होणार आहे.यावेळी बुथ अध्यक्ष ,सुपरवारीअर ,शक्ती केंद्र प्रमुख ,महिला बुथ अध्यक्षा, युवक बुथ अध्यक्ष अशा सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शंभर टक्के संघटन बांधणी करून लोकसभा उमेदवारच्या विजयासाठी एकत्रित झटणार आहोत असे त्यांनी सांगितले.
यावेळी आंबोली महिला मंडळ अध्यक्षा सौ प्राजक्ता केळुसकर यांनी २२ जणांची एक महिला संघटन बांधणीची कार्यकारणी जाहीर केली.