पंचायत समिती देवगड येथे शिवजयंती उत्साहात साजरी

देवगड,दि.१९ फेब्रुवारी
पंचायत समिती देवगड येथे गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांच्या मार्गदर्शनाखाली व कक्ष अधिकारी संतोष बिर्जे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली .
यावेळी पशुधन वैदयकीय अधिकारी डॉ . माधव घोगरे यांच्या हस्ते श्री . छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले .यानंतर डॉ माधव घोगरे यांनी आपले मनोगत व्यक्त करत श्री . छत्रपती शिवाजी महाराजांचा महिमा सांगितला . त्यानंतर सर्व शिक्षा अभियानचे विषय तज्ञ शिक्षक नारायण चव्हाण यांनी आपल्या पहाडी आवाजाने पंचायत समिती देवगडचा परीसर शिवमय केला . यावेळी त्यांनी गायण केलेल्या शिवनेरीवर शिवबा जन्मला , शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भिती , स्वराज्याच्या रक्षणासाठी झाला महाराष्ट्राचा पाया या गाण्यांना शिवप्रेमीनी दाद देत शुभेच्छा दिल्या .
यावेळी पंचायत समिती देवगड लेखाधिकारी रमेश उपलवार , वरीष्ठ सहाय्यक स्वप्नजा बिर्जे , कनिष्ठ सहाय्यक उमेश ठाकुर , वरीष्ठ सहाय्यक प्रमोद मुणगेकर , आरोग्य विस्तार अधिकारी जी.डी. अडुळकर ,वरीष्ठ सहाय्यक विलास लोके , कनिष्ठ सहाय्यक अजित ढोके , वरीष्ठ सहाय्यक सुरेखा लोके, अभियंता प्रथमेश देसाई , कनिष्ठ सहाय्यक नितीन कोयंडे ,वरीष्ठ सहाय्यक सुविदया तांबे , पाणी गुणवत्ता तज्ञ हर्षदा बोथीकर , हवालदार रमेश चव्हाण , परिचर दया जामसंडेकर , परिचर श्रीम .जाधव आदी मान्यवर उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कक्ष अधिकारी संतोष बिर्जे तर आभार विनायक धुरी याने मानले .