तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने नंदकुमार घाटे यांचा सत्कार
देवगड,दि.१९ फेब्रुवारी
देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्यास देवगड चे दानशूर उद्योगपती नंदकुमार घाटे यांनी भेट देऊन छत्रपती शिवरायांचे दर्शन घेऊन अभिवादन केले.या निमित्ताने नंदकुमार घाटे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.देवगड तालुका सकल मराठा समाज पदाधिकाऱ्यांना नंदकुमार घाटे यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी अध्यक्ष संदीप साटम,अविनाश सावंत,दयानंद पाटील योगेश राणे,किसन सूर्यवंशी,राजू पाटील,मिलिंद माने,नंदू देसाई ,शरद ठुकरुल,पप्पू कदम, प्रवीण सावंत शिवप्रेमी नागरिक सहभागी झाले होते.