सावंतवाडी दि.१९ फेब्रुवारी
भाजपच्या महिला संघटना बळकटीसाठी मंडळ निहाय आंबोली मंडळाच्या माध्यमातून २२ महिलांची कार्यकारिणी आज आंबोली मंडळ अध्यक्षा सौ प्राजक्ता केळुसकर यांनी जाहीर केली.
यावेळी भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ श्वेता क़ोरगावकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, रूपाली शिरसाट, मिसबा शेख ,आंबोली मंडळ अध्यक्ष रवींद्र मडगावकर, बांदा मंडळ अध्यक्ष महेश धुरी, अशोक सावंत उपस्थित होते.
यावेळी प्राजक्ता केळुस्कर आंबोली मंडळ अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली २२ महिलांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये उपाध्यक्ष रूचीरा परब( बावळट), मीनल जंगम (कलंबिस्त ),वर्षा वरक (आंबेगाव ),सरचिटणीस प्रणाली टिळवे (कोलगाव), प्रियांका प्रमोद गावडे ( निरवडे ),चिटणीस अपर्णा तळवणेकर (कारीवडे ),माधवी राऊळ (शिरशिंगे), सदस्य मनस्वी सावंत (ओवळीये ), श्रृष्णवी राऊळ ( माडखोल ),सुनिता राऊळ (सांगेली), देवयानी पवार (सावरवाड ), रुचिका राऊळ (वेर्ले ),प्रेमा गवस (गेळे ),सावित्री पालेकर (आंबोली), रसिका सावंत( देवसु ), तन्वी राऊळ (नेमळे) डॉ. भक्ती कांडरकर (तळवडे), सुजाता हरमलकर (मळगाव), स्नेहल कासले (केसरी), सुषमा गावडे (चौकुळ),अर्चना परब (भालावल ) यांची आंबोली मंडळ पदाधिकारी म्हणून नियुक्ती केल्याचे सौ प्राजक्ता केळुसकर यांनी सांगितले