पेरीचे भाटले आणि रायाचे भाटले येथील अतिक्रमण हटवण्यासंदर्भात साखळी उपोषण पाचव्या दिवशीही सुरू

सतीश आकेरकर,सिद्धेश आकेरकर यांनी याठिकाणी भेट देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा जाहीर

आंबोली,दि.१९ फेब्रुवारी

ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे तो नेमका सर्व्हे क्रमांक भूमी अभिलेखकडून तसेच वन लागल्यामुळे वनविभागाने देखील मोजमापे घेतली आहेत तसेच संबंधित अतिक्रमण करून बांधकाम करणाऱ्या व्यक्तीला नोटीस पाठवलेली आहे दोन दिवसात अहवाल मागवण्यात आला आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे पुढील प्रक्रिया करण्यासाठी अवगत केले असल्याचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी उपोषणकर्त्याना आंबोलीत सांगितले. पेरीचे भाटले आणि रायाचे भाटले येथील अतिक्रमण हटवण्यासंदर्भात साखळी उपोषण पाचव्या दिवशीही सुरू आहे.आज मनसे आंबोली विभाग अध्यक्ष काशीराम गावडे, तालुकाप्रमुख ऍड.अनिल केसरकर यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत सतीश आकेरकर,सिद्धेश आकेरकर यांनी याठिकाणी भेट देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा जाहीर केला.तसेच तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून या ठिकाणी बोलावून घेतले. यानंतर चार वाजता तहसीलदार श्रीधर पाटील यांनी भेट दिली.यावेळी त्यांनी याठिकाण चा नेमका सर्व्हे क्रमांक किती आहे तो अहवाल भूमी अभिलेख कडून मागितला आहे.वनक्षेत्र लागल्याने वनविभागाने देखील मोजमापे घेतली आहेत.त्यांच्याकडून अहवाल मागितला आहे व त्यांना अतिक्रमण हटवण्यासदर्भात पत्र दिले आहे.ग्रामपंचायत ने घर नंबर देऊ नये असे पत्र दिले असताना सुद्धा दिले याची चौकशी होणार आहे.ग्रामस्थांनी ग्रामपंचायत बरखास्त करण्याची मागणी केली तशा घोषणा ही तहसीलदारांसमोर दिल्या.यावेळी त्यांनी तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात येईल असे सांगितले. याठिकाणी वनविभाग आरोग्य विभाग पोलीस यांचे प्रतिनिधी ठेवण्यासंदर्भात पत्र उपोषणकर्त्या एक महिलेकडे दिले.यावेळी ग्रामस्थानी जोरदार घोषणा दिल्या.अतिक्रमण बाबत तातडीने निर्णय घ्या. तहसीलदारांनी उपोषणकर्त्याना प्रक्रिया चालू असून अहवाल तातडीने मागितले आहेत. असे सांगितले.यावेळी झिला गावडे, रामा गुरव,प्रकाश गुरव माजी सैनिक अध्यक्ष आत्माराम गावडे यानी भूमीका मांडली. मनसे चे ऍड.अनिल केसरकर यांनी या उपोषण संदर्भात तहसीलदार यांच्याकडे ग्रामस्थांची भूमिका मांडली. यावेळी ३०० च्यावर ग्रामस्थ उपस्थित होते.फौजदार वाडी,रमाईनगर,गावठण,कामतवाडी, मुळवंद,जकातवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.