उद्योजक सतीश आचरेकर यांच्या पुढाकाराने शिवराजेश्वर मित्रमंडळाने भव्य दिव्य शिव शोभायात्रा काढत शिवजयंती उत्सव साजरा
मालवण,दि.१९ फेब्रुवारी
जय भवानी …जय शिवाजी…. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी तसेच ढोल ताश्याचा गजर …बच्चचे मंडळींनी साकारलेल्या विविधांगी वेशभूषा …चित्ररथ आणि सहभागी झालेले हजारो शिवप्रेमी … अशा भारलेल्या वातावरणात आज मालवणात मालवणचे तरुण उद्योजक सतीश आचरेकर यांच्या पुढाकाराने शिवराजेश्वर मित्रमंडळाने भव्य दिव्य शिव शोभायात्रा काढत शिवजयंती उत्सव साजरा केला.
मालवण येथील शिवराजेश्वर मित्रमंडळातर्फे विविध कार्यक्रमानी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त आज सकाळी सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेऊन व साकडे घालून शिवज्योत प्रज्वलीत करण्यात आली. या शिवज्योतीची सिंधुदुर्ग किल्ल्यावरून ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत होडीतून मालवण बंदर जेटी पर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सतीश आचरेकर, उद्योजक सहदेव बापर्डेकर, निलेश वेरणेकर (ब्लॅक टायगर, गोवा ), बाबा जोशी, जितेश ढवळे, रोहन आचरेकर, रोहित जोशी, आनंद आचरेकर, मॉन्टी तारी, हरेश ढवळे, तुषार मसुरकर, अंकित जोशी, अनिकेत जोशी, मनोज आढाव, अनमोल आढाव, प्रथमेश आढाव, गौरेश आढाव, सुशांत कोचरेकर, सिद्धेश मलये, साईल चोपडेकर, रुपेश आढाव, विनायक परब, संजय नार्वेकर, दयानंद जंगले, बाबा मुकादम सिल्व्हेस्टर फर्नाडिस यासह मित्रमंडळाचे सदस्य, बहुसंख्य शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.
तर सायंकाळी मालवण भरड येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजाच्या भव्य सिंहासनी मूर्तीला पुष्पहार अर्पण करून शोभयात्रेला प्रारंभ झाला. शिवरायांची मूर्ती रथावर विराजमान करण्यात आली. या शोभायात्रेत मुंबईतील सुप्रसिद्ध आराध्य ढोलताशा पथक व ‘मालवणी सुपरहिट’ रोंबाटा मधील विविध प्रतिकृतीनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. तर बच्चे कंपनीने छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, देव देवता, राक्षस, प्राणी अशा विविध वेशभूषा परिधान करून या शोभयात्रेत सहभागी होत वेगळी रंगत आणली. तसेच घोड्यावर स्वार बालशिवाजी व जिजामाता तसेच हत्तीची प्रतिकृतीही लक्षवेधी ठरली. यावेळी सिंधुदुर्गातील नामांकित डीजेद्वारे विविध शिवगीते सादर होऊन उपस्थित शिवप्रेमीनी त्यावर ठेका धरत नृत्याचा आनंद लुटला. ही शोभायात्रा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या शिव मिरवणुकीवर एकता मित्रमंडळासह नागरिकांनी पुष्पवृष्टी केली या सोहळ्याला पंधरा हजारच्यावर शिवप्रेमींनी उपस्थिती दर्शविली