कबड्डी स्पर्धांमध्ये जामसंडे सन्मित्र मंडळाचे नाव सातासमुद्रापार….

जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्या हस्ते जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेच्या उद्घाटन

देवगड,दि. २० फेब्रुवारी   

जामसंडे सन्मित्र मंडळाचे आयोजन व नियोजन हे उत्कृष्ट प्रकारे असून कबड्डी स्पर्धांमध्ये जामसंडे सन्मित्र मंडळाचे नाव सातासमुद्रापार गेले आहे. कबड्डी सारख्या स्पर्धा जिल्ह्यामध्ये होणे काळाची गरज असून जिल्ह्यामध्ये मलखांब सारख्या स्पर्धांचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे असल्याचे मत जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने जामसंडे सन्मित्र मंडळ आयोजित आमदार भाई गिरकर यांच्या सहकार्याने माजी आमदार कैलासवासी आप्पासाहेब गोपटे स्मृती चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्या हस्ते फ़ित कापून करण्यात आले. यावेळी दीपप्रज्वलन एडवोकेट प्रकाश बोडस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी देखील स्पर्धाकांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी आमदार अजित गोगटे तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर,जामसंडे सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष सदाशिव भुजबळ, कार्यवाह चंदू पाटकर,शरद ठुकरुल, राजेंद्र वालकर,सुभाष धुरी,प्रवीण जोग,कौस्तुभ जामसंडेकर,दयानंद पाटील, प्रसाद घाडी आदी भाजपा पदाधिकारी नगरसेवक उपस्थित होते.जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने कॅरम स्पर्धकांनी सहभाग नोंदविला