गरूडझेप अंतर्गत विविध स्पर्धा रिल्स स्पर्धा खास आकर्षण

वेंगुर्ला,दि.२० फेब्रुवारी

वेंगुर्ला-राऊळवाडा येथील जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळातर्फे याहीवर्षी २४ ते २६ फेब्रुवारी कालावधीत ‘गरूडझेप महोत्सव २०२४‘चे आयोजन करण्यात आले आहे.

दि. २४ रोजी सकाळी ९ वा. नायरा पेट्रोलपंप राऊळवाडा येथे रक्तदान शिबिर होणार आहे. याच्या अधिक माहितीसाठी साबाजी राऊळ (९६७३५०७९४४) किवा ज्ञानेश्वर रेडकर (७०५७२७८७२७) यांच्याशी संफ साधावा. सायं. ७ वा. नायरा पेट्रोल पंपानजिक जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धा आयोजित केली असून यातील प्रथम तीन क्रमांकांना ५ हजार, ३ हजार, २ हजार व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी ४०० रू. प्रवेश असून संघांनी आपली नावनोंदणी स्वप्निल पालकर (८४८२८३५३९३) किवा बापू वेंगुर्लेकर (९६०४२६२७३३) यांच्याशी संफ साधावा.

दि. २५ फेब्रुवारी सकाळी १० वा. वेंगुर्ला शाळा नं.४, सातेरी मंदिर नजिक, जिल्हास्तरीय चित्रकला व रंगभरण स्पर्धा होणार असून पहिली ते दुसरीसाठी रंगभरण, ३री ते ४थीसाठी ‘झाडाखाली बसलेला प्राणी‘, ५वी ते ७वीसाठी ‘आवडता खेळ किवा सण‘, ८वी ते १०वीसाठी ‘समुद्र किनारा स्वच्छता करणारी मुले‘ आदी विषय ठेवण्यात आले आहे. स्पर्धकांनी आपली नावनोंदणी विवेक राऊळ (९७६४१४८१५२) किवा चंदन रेडकर (८१८०८७८१४३) यांच्याकडे करावी. सायं. ६ वा. नायरा पेट्रोलपंपाजवळ महिलांाठी होम मिनिस्टर आयोजित केली असून प्रथम येणा-या ५० महिलांना सहभाग देण्यात येणार आहे. नावनोंदणी मंगेश परब (८१४९६१७२०९) किवा कौशल मुळीक (९४२११०१९४३) यांच्याकडे करावी. सायं.७ वा. वेंगुर्ला क्युन स्पर्धा होणार असून यातील प्रथम तीन क्रमांकांना ७ हजार, ५ हजार, ३ हजार तसेच बेस्ट स्माईल १०००, बेस्ट हेअर १०००, बेस्ट लूकसाठी १००० ची पारितोषिक दिली जाणार आहे. नावनोंदणी स्वप्निल पालकर (८४८२८३५३९३) किवा बापू वेंगुर्लेकर (९६०४२६२७३३) यांच्याकडे करावी.

दि. २६ फेब्रुवारी रोजी सायं. ५ वा. नाचणीच्या पिठापासून पाककला स्पर्धा आयोजित केली आहे. नावनोंदणी ज्ञानेश्वर रेडकर (७०५७२७८७२७) किवा अद्वैत आंदुर्लेकर (९१६८३५७०९३) यांच्याकडे करावी. सायं. ७ वा. बक्षिस वितरण व लकी ड्राॅ स्पर्धेचा निकाल, सायं.८ वा. जय हनुमान पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाचा ‘शिवपदस्मरण‘ अर्थात ‘मांस पत्नीचे ताट भोजनाचे‘ हे ट्रीकसीनयुक्त हा नाट्यप्रयोग होणार आहे.

यावर्षीच्या या महोत्सवाचे रिल्स स्पर्धा हे खास आकर्षण आहे. या स्पर्धेच्या माहितीसाठी अनंत रेडकर (९६७३१२६५३५) किवा दिनेश पाटील (७२१९४८२७७७) यांच्याकडे करावीत. या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा तसेच नागरिकांनी महोत्सवाला उपस्थित रहावे असे आवाहन मंडळातर्फे केले आहे.