देवगड,दि.२० फेब्रुवारी
सोलापूर जिल्हा परिषदच्या टिमने भेट दिली
किंजवडे ग्रामपंचायतीच्या स्वच्छता विषयक उपक्रमांना
भेट दिली राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान सन2023/24 अंतर्गत सोलापूर जिल्हा परिषदेच्या
टिमने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवस्थानची भुमी म्हणून ओळखले जाणाऱ्या किंजवडे ग्रा.पं. तीला नुकतीच भेट दिली व ग्रा.पं.तीने स्वच्छता विषयक राबविलेल्या
विविध उपक्रमाची माहीती घेतली
गटविकास अधिकारी माळशिरस गटविकास अधिकारी अक्कलकोट विस्तार अधिकारी यांसह सरपंच
उपसरपंच सदस्य मुख्य सेविका उपस्थित होते. यावेळी किंजवडे गावचे सरपंच श्री.संतोष किंजवडेकर यांनी समिती सदस्याचे स्वागत केले व ग्रामसेवक श्री.शिवराज राठोड यांनी गावाची माहिती दिली. यावेळी. ग्रामपंचायत सदस्य श्री.किरण टेबुलकर, श्री.प्रविण तेली व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. समितीने गावातील पाऊस पाणी संकलन प्रकल्प,गावातील सार्वजनिक वाचनालय आणि सोलर आँन ग्रेड सिस्टीम.डिजिटल अंगणवाडी. गावातील ऐतिहासिक वृक्ष गणना, गावातील जैवविविधता बदल माहिती व प्रत्यक्ष पाहणी. झ-यावरील पाणी पुरवठा. बायोगॅस संयत्र, शौचालय वापर व देखभाल संदर्भात माहिती, विविध उपक्रमांना भेट दिली माहिती घेतली. महिला बचत गटाच्या विविध प्रकारच्या उत्पादन पाहून समितीने मना पासून कौतुक केले. जि.प. सोलापूर अंतगत उपस्थित सरपंच उपसरपंच
यांनी विविध उपक्रमांची माहीती यातील कोणता प्रकल्प आपल्या गावात राबवता येईलयाचा अभ्यास केला व किंजवडे गावचे ग्रामदैवत श्री.स्थानेशवर देवस्थान चे दर्शन घेऊन गावातील मिळालेल्या माहिती बदल समाधान व्यक्त केले.सदर समिती मा. मनीषा आव्हाळे भा.प्र. से. मुख्यकार्यकारी अधिकारी व श्री इशादिन शेळकंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांचे मार्गदर्शना खाली आले होते. सदर अभ्यास दौऱ्यात मा. श्री विनायक गुळवे ग.वी.अ., मा. श्री चिलवंत सहा.ग.वी.अ, सुतार, घाडगे, लोंढे,भोरे, चव्हाण, विस्तार अधिकारी पंचायत, आरोग्य, सरपंच, श्रीमती लुबाळ, श्रीमती ढेकळे,श्री खंदारे, श्री गवंडी उपसरपंच, अमोल महिंद्रकर आर जी पी एस ए सर्व सर्वे, व जिल्हा परिषद कडील अधिकारी व कार्मचारी उपस्थितत होते.
Home आपलं सिंधुदुर्ग सोलापूर जिल्हा परिषदच्या टिमने भेट दिली किंजवडे ग्रामपंचायतीच्या स्वच्छता विषयक उपक्रमांना भेट