कणकवली दि .२० फेब्रुवारी(भगवान लोके)
पंचक्रोशी ठाकर समाज कणकवलीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी कणकवली येथे आमदार नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजासाठी सामाजिक न्याय व क्रीडा विभाग दि. २ जून २००४ च्या शासन निर्णयात शुद्धिपत्र आणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाज आदिवासी असल्याबाबत आदेश निर्गमित करण्यात यावा,अशी मागणी आ.नितेश राणे यांच्याकडे करण्यात आली.
तसेच सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यातील अनुसूचित जमातीची जात पडताळणी समिती सिंधुदुर्गमध्ये होण्यासाठी देखील मागणी केली. सदरच्या मागण्या अगदी रास्त असल्याचे आ. नितेश राणे यांनी सांगितले. आपण स्वतः चार दिवसात संबंधित सर्व मंत्री आणि अधिकारी यांची तात्काळ बैठक लावून पंचक्रोशी ठाकर समाजाच्या चार सदस्यांना निमंत्रित केले आहे. आपण या दोन्ही मागण्यांचा शासन निर्णय तात्काळ काढू, अशी ग्वाही देखील आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. पंचक्रोशी ठाकर समाजा कणकवलीच्या वतीने आमदार नितेश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन यावेळी आभार मानण्यात आले.
यावेळी अमित ठाकूर, समीर ठाकूर, सुहास ठाकूर, दिगंबर गवाणकर, राजेश गंगावणे, सचिन ठाकूर, राजन रणसिंग, निलेश गंगावणे, स्वप्निल गंगावणे, मदन ठाकूर, पंकज ठाकूर, केदार ठाकूर, अविराज मराठे, प्रशांत मराठे, संतोष मराठे, सच्चिदानंद ठाकूर, सुरेश ठाकूर, रामदास ठाकूर, रामजी ठाकूर, मयूर ठाकूर आदी सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.