वेंगुर्ला, दि .२० फेब्रुवारी
बॅ.खर्डेकर महाविद्यालयात युवा महोत्सवानिमित्त कै.काकासाहेब चमणकर स्मृतिप्रित्यर्थ जगदीश चमणकर पुरस्कृत व किशोर सोन्सुरकर सातेरी व्यायामशाळा मार्गदर्शित आंतरवर्गीय शरिरसौष्ठव स्पर्धा संपन्न झाली. उद्घाटन पं.स.चे माजी सभापती जयप्रकाश चमणकर, प्रा.वामन गावडे, स्थानिक सल्लागार समिती सदस्य सुरेंद्र खामकर, आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल पंच अशोक दाभोलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी नाईक जिम फिटनेस सेंटरचे अमित नाईक, माजी सभापती अभिषेक चमणकर, प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले, सुरेंद्र चव्हाण, ऐश्वर्य चमणकर, किशोर सोन्सुरकर, प्रा.डी.जे.शितोळे, प्रा.देविदास आरोलकर, अबोली सोन्सुरकर, प्रा.संजय चमणकर, प्रा.विरेंद्र देसाई, प्रा.बी.जी.गायकवाड, प्रा.हेमंत गावडे, प्रा.जे.वाय.नाईक यांच्यासह अन्य प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. स्पर्धेतील विजेते खालीप्रमाणे.
सिनियर बॅ.खर्डेकर श्री – प्रथम-अथर्व पालव (एफ.वाय.बी.कॉम), द्वितीय-शंकर गावडे (एस.वाय.बी.कॉम), तृतीय-लक्ष्मण परब (टी.वाय.बी.कॉम), ज्युनिअर बॅ.खर्डेकर श्री – प्रथम-पवन कांबळे (१२वी-एम.सी.व्ही.सी.), द्वितीय-यश सावंत (बारावी), तृतीय-स्वर्णिम देऊलकर (११वी-एम.सी.व्ही.सी.) स्पर्धेचे परिक्षण किशोर सोन्सुरकर व अंकित सोन्सुरकर यांनी केले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.