कणकवली दि.२० फेब्रुवारी(भगवान लोके)
मराठी भाषा दिनच्या औचित्याने युवा संदेश प्रतिष्ठान आणि कनेडी पंचक्रोशी ग्राम वाचनालय यांच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी मराठी भाषा दिन निमीत्त सकाळी ठीक १०.३० वा. जि. प. शाळा कनेडी बाजारपेठ, सांगवे येथे नाटळ- सांगवे व हरकुळ जि. प. मतदार संघ मर्यादित विविध स्पर्धां आयोजित करण्यात आल्या आहेत.
दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ सकाळी ठीक १०:३० वा.कथाकथन स्पर्धा
गट इ १ते ४(वेळ ३ मिनीट)
विषय – बोधकथा
गट ५ ते ७(वेळ ५ मिनीट)
विषय:साहसकथा,हस्ताक्षर स्पर्धा गट इ १ ते ४
गट ५ ते ७ वी.,निबंध स्पर्धा
गट इ १ते ४ थी (शब्दमर्यादा १००)
विषय -१) मला आवडलेली गोष्ट,२) मी अंतराळवीर झालो तर ,३) माझे आवडते पुस्तक,गट ५ ते ७(शब्दमर्यादा २००),विषय: १) वाचाल तर वाचाल.,२)भारताची चंद्रयान -३ मोहीम ,३) पुस्तकाचे आत्मवृत्त
सर्व स्पर्धांतील प्रथम तीन क्रमांकाना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच सर्व गटात २ उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील.तरी सर्वांनी सहभागी होण्याचे व अधिक माहितीसाठी श्री नरेंद्र चिंदरकर (८६९८७०३०८६)किंवा वाचनालय सचिव श्री नाना काणेकर यांना संपर्क साधण्याचे आवाहन ग्राम वाचनालय अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत , युवा संदेश प्रतिष्ठान अध्यक्षा तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना संदेश सावंत यांनी केले आहे.