हिंमत असेल तर माझ्या विरोधात लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उतरावेत-खासदार विनायक राऊत

सावंतवाडी दि.२० फेब्रुवारी 
हिंमत असेल तर माझ्या विरोधात लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उतरावेत असे खुले आव्हान खासदार विनायक राऊत यांनी दिले आहे .
येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये विनायक राऊत बोलत होते यावेळी पत्रकारांनी लोकसभा निवडणुकीत नारायण राणे उभे राहिले तर ? असा प्रश्न उपस्थित केला असता खासदार विनायक राऊत म्हणाले, लोकसभा निवडणुकीत हिंमत असेल तर केंद्रीय मंत्री नारायण यांना पराभूत व्हायचे असेल तर रिंगणात उतरावे तसेच किरण सामंत हे उभे राहत असतील तर त्यांनीही उभे राहावे त्यांचा त्यांनाही जनता पराभूत करेल असे त्यांनी सांगितले.
यावेळी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब, जिल्हा प्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ ,चंद्रकांत कासार, बाळा गावडे व पदाधिकारी उपस्थित होते.