केसरकर यांनी आमदारकीसाठी शिवसेनेला पैसे दिले असे श्री देव उपरलकर च्या पायाला हात लावून सांगावं-खासदार विनायक राऊत

सावंतवाडी,दि.२० फेब्रुवारी
केसरकर यांनी आमदारकीसाठी शिवसेनेला पैसे दिले असे श्री देव उपरलकर च्या पायाला हात लावून सांगावं. आम्ही बेईमान नाही. ज्यांनी मदत केली ती सांगणारे आहोत. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करण्यापूर्वी केसरकर यांनी गोवा हाॅटेल मधील व्यवहार व पक्षनिधी त्यांना दिला त्याबद्दल बोलावें. त्यांनी अधिकच केले तर गांधी चौकात जनतेसमोर पर्दाफाश करावा लागेल असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत केसरकर यांना दिला.

आर्थिक स्थिती खालावल्याचे सांगुन २०१९ च्या विधानसभेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून परतफेडीवर घेतलेला पक्षनिधी चेकव्दारे परत केल्यावर त्याचे भांडवल करुन दिपक केसरकर मंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंना एक कोटी दिले असे खोटे आरोप करीत आहेत. पक्षाने दिलेली बरिच रक्कम अजून येणे बाकी असून त्यावर आता पाणी सोडले, मात्र त्यांनी उगाच खोटे आरोप केल्यास आम्हालाही सावंतवाडीच्या गांधी चौकात त्यांचा उघड पंचनामा करावा लागेल असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी आज येथे दिला.
तर २०१४ मध्ये सावंतवाडी मतदारसंघात शैलेश परब यांचे काम पाहून घाबरलेल्या दीपक केसरकर यांनी शिवसेनेत उडी घेत तिकीट मिळविले उद्धव ठाकरे यांनी पहिल्या टर्म मध्ये मंत्रीपद, अर्थ,वित्त मंत्री,पालकमंत्री केले परंतु खाल्ल्या ताटात घाण करायची केसरकारांनी दाखवलेली वृत्ती दुदैवी आहे असेही खासदार राऊत म्हणाले.
खासदार श्री राऊत यांनी आज सावंतवाडीत पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष संजय पडते सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब जिल्हा समन्वयक बाळा गावडे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ मायकल डिसोजा चंद्रकांत कासार, मंदार शिरसाट, शिवदत्त घोगळे, हिमांशू परब सुनील गावडे आबा सावंत आधी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, नेहमी साईबाबांचा जप करणाऱ्या केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर केलेले असभ्य असत्य आणि खोटे आरोप साईबाबांच्या भक्तांना व खुद्द् साईबाबांना तरी आवडेल का ? याचा विचार त्यांनी करावा मुळात भर उन्हात सावंतवाडीच्या गांधी चौकात उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित केले या सभेला ज्या संख्येने सावंतवाडीकर उपस्थित राहिले हे पाहिल्यानंतर की सरकार हे खोटारडे आरोप करत आहेत मुळात शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पहिल्याच टर्ममध्ये त्यांना उद्धव ठाकरे यांनी मंत्री केले सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद दिले परंतु असे असतानाही ज्या ताटात खायचे त्यात ताटात घाण करायची ही वृत्ती त्यांनी दाखवली माझ्या खासदारकीच्या निवडणुकीतही त्यांनी मला मदत केली याबाबत आपण त्यांचे आभार मानतो आणि याआधीही मानले आहेत. ते त्या संपूर्ण खासदारकीच्या प्रचार यंत्रणेमध्ये ते कधीच सहभागी झाले नाही त्यांनी गोव्याच्या हॉटेलमध्ये बसून प्रेस नोट देण्यापलीकडे त्यांनी थेट पत्रकार परिषदेमध्ये किंवा थेट प्रचारामध्ये आपली बाजू कधीच मांडली नाही त्यांनी केलेले उपकार आम्ही कधीच विसरणार नाही आमची वृत्ती कृतज्ञपणाची नाही. परंतु त्या वेळेला गोव्याच्या मला पाठिंबा देताना जे काही बोलणं झालं जे काही देणं घेणं झालं हे आत्ता बोलणार नाही परंतु आपण कोण खूप मोठे सज्जन आहोत असे केसरकर यांनी दाखवून देऊ नये.
खासदार श्री राऊत पुढे म्हणाले, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आर्थिक स्थिती खालावल्याचे सांगून उद्धव ठाकरे यांच्याकडे परतफेडीवर पक्षनिधी मागितल्यानंतर कुठलाही विचार न करता मंत्री असतानाही दीपक केसरकर यांना पक्षाने निधी दिला. तो किती दिला हे मी सांगणार नाही परंतु नाही दिला असे त्यांनी साईबाबांची शपथ घेऊन सांगावे. आणि त्यातील काही अंशी रक्कम त्यांनी पक्षाकडे परत केली अजूनही बरीचशी रक्कम बाकी आहे परंतु आम्ही त्यावर पाणी सोडले, त्यांनी जेवढे पचेल तेवढे खावं मात्र कदाचित जी रक्कम त्यांनी परत केली त्याचे भांडवल करून आपण मंत्रिपदासाठी एक कोटी रुपये घेतले असे खोटे आरोप ते उद्धव ठाकरे यांच्यावर करत आहेत. मात्र ज्यांनी तुम्हाला खरे राजकीय वैभव प्राप्त करून दिले त्यांच्यावर अशा प्रकारे खोटे आरोप करत असाल तर आम्हालाही सावंतवाडीच्या गांधी चौकात तुमचा उघड पंचनामा करावा लागेल.मुळात बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विचारात आम्ही घडलो आहोत त्यामुळे तोंड सोडून वाटेल तशी बदनामी करणार नाही मात्र दहशत वादाचा बागुलबुवा करत खासदारकीच्या निवडणुकीत गोव्याच्या हॉटेलमध्ये झालेली लेन देन आणि अन्य गोष्टी आम्हाला बाहेर काढाव्या लागतील. मुळात 2014 मध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये शैलेश परब यांनी चांगले काम केले होते त्यावेळी शिवसेना-भाजप युती असताना जनतेचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद होता या वेळी आपल्या दुकान बंद होईल या भीतीने त्यांनी शिवसेनेत पुढे घेतली आणि शिवसेनेच्या जोरावर आमदारही झाले अन्यथा केसरकर निवडूनही येऊ शकले नसते.