सावंतवाडी दि.२० फेब्रुवारी
तालुक्यातील आजगाव येथील विद्या विहार इंग्लिश स्कूल या प्रशालेत कै. गुरुवर्य रा. गो. सामंत स्मृती समूहगीत गायन स्पर्धा दिनांक २५ फेब्रुवारी रोजी करण्यात आल्या आहेत.
विद्या विहार इंग्लिश स्कूल, आजगावचे माजी मुख्याध्यापक गुरुवर्य रा. गो. सामंत यांच्या स्मृति प्रित्यर्थ प्रशालेने रविवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता समूहगीत गायन स्पर्धा आयोजित केली आहे.
स्पर्धेतील पारितोषिके खालील प्रमाणे:-
1) प्रथम क्रमांक:- चषक व ₹ 1000/
2) द्वितीय क्रमांक :- चषक व ₹ 700/
3) तृतीय क्रमांक :- चषक व ₹500/
तरी या स्पर्धेत सहभाग जास्तीत जास्त शाळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
असे आहेत स्पर्धेचे नियम :-
1) इयत्ता पहिली ते दहावी प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात.
2) गीतामध्ये समाविष्ट असणाऱ्या मुलांची संख्या 10 पेक्षा अधिक असू नये.
3) गीत मराठी किंवा हिंदी भाषेतील असावे.
4) गीत देशभक्तीपर असावे
5) इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा वापर करू नये.
6) स्पर्धकांनी नियोजित वेळेपूर्वी हजर राहावे.
7) परीक्षकांचा निर्णय हा अंतिम राहील.
अधिक माहितीसाठी संपर्क साधावा –
मुख्याध्यापक श्री. उत्तम भागीत
(9420636455)
श्रीम. के. के. साळवी
(9764209423)
श्रीम. मानसी परूळेकर
(9403938270)