कॅरम स्पर्धेत यश संपादित करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार
सावंतवाडी दि.२० फेब्रुवारी
राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने गवळीतीठा येथे शिवजयंती साजरी करण्यात आली . यावेळी कॅरम स्पर्धेत यश संपादित करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
कॅरम खेळाडू साक्षी रामदूरकर, कुमारी आयरे,कु. घाडी यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,अध्यक्ष बंटी माठेकर , सावंतवाडी मराठा समाज अध्यक्ष पत्रकार सीताराम गावडे, पत्रकार अभिमन्यू लोंढे,उपाध्यक्ष बंड्या तोरसकर ,सचिव दिपक सावंत,उपाध्यक्ष विजय पवार,अरुण घाडी ,महादेव राऊळ ,संगेलकर, सुंदर गावडे, विजय गवळी, तनिष गवळी ,सत्यवान नाईक , माजी नगरसेवक सुरेश भोगटे, उमेश कोरगावकर , विलास जाधव, दिलीप भालेकर, दिपाली भालेकर , रवी जाधव आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
माजी आमदार राजन तेली व माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी शुभेच्छा दिल्या.