तपस्वी, विचारवंत, ध्येयनिष्ठ नेतृत्व अमृत महोत्सवी वाटचाल करत आहे त्या प्रवीण भोसले यांनी दीपस्तंभ सारखे काम केलेले आहे-खा.विनायक राऊत

सावंतवाडी,दि.२० फेब्रुवारी 
तपस्वी, विचारवंत, ध्येयनिष्ठ नेतृत्व अमृत महोत्सवी वाटचाल करत आहे त्या प्रवीण भोसले यांनी दीपस्तंभ सारखे काम केलेले आहे असे उद्गार खासदार यांनी भोसले यांना शुभेच्छा देताना काढले.
खासदार विनायक राऊत म्हणाले, राज्य सत्तेची कोणतीही पदे नसताना ते आजही जनकल्याणाचे काम करत आहे तसेच त्यांच्या वर प्रेम करणारी मान्यवरांची उपस्थिती ही राजकारण आणि पक्ष विरहित आहे त्यांनी केलेल्या कामामुळे ते शक्य झालं सध्याच्या राजकारणामध्ये विश्वासाहर्ता संधी साधूपणा समोर येतो त्या विचारांची त्यांनी कधीही साथ दिली नाही हवामान बदलाप्रमाणे राजकारणातील वातावरण बदलते अशा प्रतिकूल परिस्थितीतही प्रवीण भोसले हे एकनिष्ठ राहिले भारताचा आणि प्रवीण भोसले यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस होत आहे त्यांनी केलेले कार्य दीपस्तंभ सारखे आहे असे ते म्हणाले
माजी मंत्री प्रविण भोसले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सावंतवाडीतील आरपीडी हायस्कूलच्या हाॅलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री अँड रमाकांत खलप, श्रीमंत खेमसावंत भोसले,जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, ईशाद शेख, बबन साळगावकर रविंद्र भोसले, विकास सावंत, सुभाष गोवेकर, व्हिक्टर डॉन्टस, बाबल ठाकूर पुंडलिक दळवी, ॲड.दिलीप नार्वेकर,एस आर सावंत,भगवान देसाई, संजय पडते, रूपेश राऊळ, प्रमोद कामत आदी उपस्थित होते.

रवींद्र भोसले म्हणाले , आई-वडिलांनी दिलेले संस्कार आयुष्यभर प्रवीणभाई नी जपासले सर्वांशी प्रेमाने वागले आजही ते ७५ वर्षाचे झाले असले तरी त्यांनी कुटुंबाच्या एका उपक्रमात २१ किलोमीटर चालून क्रमांक मिळवला हे आम्ही भाग्य समजतो

आमदार वैभव नाऊ म्हणाले, प्रवीण भाई भोसले आणि आमच्या कुटुंबाचे स्नेहसंबंध आहे माझे काका प्रवीण भोसले यांच्या नेतृत्वाखालीच काम करत होते प्रवीण भोसले आज वीस वर्ष लोकप्रतिनिधी नसले तरी जनकल्याणाचे काम करत आहेत निस्वार्थीपणे ते जनसेवा करत आहे त्यांच्या आदर्श व मार्गदर्शन आमच्या जीवनात कायमच उपयोगी ठरला आहे
जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले प्रामाणिक संयमी नेतृत्व म्हणून प्रवीणभाई भोसले यांच्याकडे पाहिले जाते ते मी त्यांच्यासोबत एकदा मंत्रालयात गेल्यानंतर ते मंत्री आमदार नसतानाही त्यांना जो तेथे मंत्री मान देत होते त्यावरून त्यांचं जीवनातील प्रामाणिकपणाचे रहस्य समोर आलं.
यावेळी ज्येष्ठ नेते विकास सावंत म्हणाले प्रवीणभाई आणि मी एका निवडणुकीत रिंगणात राहिलो मात्र त्यावेळी प्रवीणभाईंचा पराभव झाला तरी त्यांनी आयुष्यात कटुता ठेवली नाही माझे वडील भाईसाहेब सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण भोसले यांनी काम केले.