मुंबई,दि.२० फेब्रुवारी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तपस्वी प. पू.सद्गुरू महाराज यांनी संजीवन समाधी घेतल्यावर आज ३९ वर्षे पूर्ण झाली आहेत.आजवर महाराजांच्या आदेशाने हे अविरत कार्य सुरू असून आपण नेहमी भगवंताचे चिंतन करा, स्वामी समर्थ, रंगनाथ स्वामी सारखेच राऊळ महाराज संत आहेत. परमेश्वराने बुद्धी जी दिली ती अपरंपार आहे. तुमच्या चरणामुळे धन्य झालो हा भाव मनी ठेवून परमेश्वराचे थोडे स्मरण करा, तुमचे जीवन कृतार्थ होईल असे प. पू. सद्गुरु गुरूदास माऊली यांनी माघ शुद्ध १० शके सोमवार १९ फेब्रुवारी रोजी मुलुंड( पूर्व) येथे गुरूस्थानी आयोजित उत्सव सोहळयात उपस्थित भक्तांना प्रबोधन करताना नमूद केले. सकाळी नित्यनैमिक पूजनाने प्रारंभ करण्यात आला. यावेळी श्री रामरक्षा आणि स्वामी समर्थ तारक मंत्र वाचन सहशिक्षिका ज्योती संजय सावंत यांनी केल्यानंतर सामुदायिक पठण केले गेले. या प्रसंगी प.पू.राऊळ महाराज आणि दत्तमूर्तीवर राजश्री चंद्रकांत सारंग, सुचिता पराडकर, पल्लवी दळवी, अर्चना सावंत, नलिनी मगदूम यांच्या हस्ते चादर चढविण्यात आली. महाआरती होऊन महाप्रसादाचा लाभ भक्तानी घेतला. सुस्वर भजन आदी भरगच्च कार्यक्रमाने सांगता करण्यात आली. सदर सोहळा श्री समर्थ राऊळ महाराज दत्त भक्त व कार्यकारी मंडळाच्या वतीने नीटनेटके नियोजन करण्यात आले होते.
Home आपलं सिंधुदुर्ग “मुलुंड गुरूस्थानी राऊळ महाराज पुण्यतिथी निमित्ताने परमेश्वराचे थोडे स्मरण करा; तुमचे जीवन...