सिंधुदुर्गात एसटीच्या ३०० पेक्षा जास्त फेऱ्या रद्द…

0

जिल्ह्यातील सर्व सामान्य प्रवाशांचे झाले हाल ; जिल्ह्यातील प्रवाशांना वाली कोण ?

कणकवली,दि.१२ जानेवारी(भगवान लोके)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उरण ७९,खालापूर २१ मिळून १०० एसटी बस गेल्या आहेत. प्रत्येक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील तब्बल ३०० पेक्षा जास्त फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यातील सर्व सामान्य प्रवाशांचे झाले हाल झाले आहेत.जिल्ह्यातील प्रवाशांना वाली कोण ? असा संतप्त सवाल प्रवासी उपस्थित करीत आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागासह लांब पल्ल्याच्या रद्द झालेल्या फेऱ्यांमध्ये कणकवली तालुक्यातील 34 , सावंतवाडीतील 36 मालवण 58, देवगड 86, विजयदुर्ग 37, कुडाळ 42, वेंगुर्ला 73 या
फेऱ्या या एसटीच्या रद्द करण्यात आल्या आहेत.

तसेच लांब पल्ल्याच्या लातूर, पंढरपूर, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सावंतवाडी या फेऱ्या तसेच जिल्हा अंतर्गत देवगड, वेंगुर्ला , मालवण व काही ग्रामीण भागातील बस फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.