पंचायत समिती देवगड येथे आदय पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

देवगड,दि.२० फेब्रुवारी
आदय पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पंचायत समिती देवगड येथे गटविकास अधिकारी श्रीम वृक्षाली यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली . यावेळी गटविकास अधिकारी उच्चस्तर वर्ग -१ वृक्षाली यादव यांच्या हस्ते आदय पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले .
याप्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी निलेश जगताप , कृषि अधिकारी मदने , अधिक्षक कुणाल मांजरेकर , अधिक्षक मेधा राणे , कनिष्ठ सहाय्यक उमेश ठाकुर , आरोग्य विस्तार अधिकारी प्रतिमा वळंजु ,वरीष्ठ सहाय्यक विलास लोके , हवालदार अरुणा लाड , हवालदार रमेश चव्हाण , भगवान परब तसेच अन्य मान्यवरांनी अभिवादन केले .