शहरातील प्रसिध्द तिर्थक्षेत्र सुशोभीकरण करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी लक्ष वेधलं

सावंतवाडी दि.२० फेब्रुवारी 
सावंतवाडी शहरातील प्रसिध्द तिर्थक्षेत्र आत्मेश्वर मंदिर व तळी तसेच परिसर याचे शैलीदार नुतनीकरण सुशोभीकरण करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी लक्ष वेधलं. याबाबतच निवेदन त्यांनी मंत्री केसरकर यांची भेट घेत सादर केलं. याला मंत्री दीपक केसरकर यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला.

सावंतवाडी शहरातील प्राचीन कालापासुन भाविकांचे श्रध्दास्थान असलेले श्री देव आत्मेश्वर मंदिर व तळी हे तिर्थक्षेत्र प्रसिध्द असुन याला विशेष ऐतिहासीक महत्व आहे.या ठिकाणी हजारो भाविक भक्तीभावाने भेट देत असतात. तसेच दरवर्षी श्रावणी सोमवार, महाशिवरात्री तसेच नवरात्रौत्सव असे विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतात.
या मंदिराला नुतनीकरण करुन बरेच वर्षे झालेली असुन सद्यस्थितीत मंदिराची बाहेरील रचना व मुख्य गाभा-यावरिल शिखर (कळस), मंदिराचे लाकडी कौलारु असलेले छप्पर काही प्रमाणात जीर्ण झालेले असुन मंदिराचा बंधीस्त स्वरुपात असलेल्या गाभा-याचे समोरील अंतराळ, महामंडपाचा भाग तसेच गाभा-याचा आजु-बाजूने हवेशीर आकर्षक रचना वगैरे साठी अत्यंत विलोभनीय नागर, द्रविड किंवा वेसर या संमिश्र शैली स्वरुपात पावित्रयपुर्वक सुशोभीकरण तसेच नुतनीकरणाची आवश्यकता आहे. त्याचबरोबर या मंदिराचे समोरील अनेकवर्षे बारामाही रात्रौ वहाणा-या प्रसिध्द पवित्र तळीचे नगरपरिषदेमार्फत गेल्या काही वर्षापुर्वि नुतनीकरण करण्यात आलेले होते.
मात्र सद्यस्थितीत तिलाही पावित्रय जपत तीचे बंद झालेले प्रवाह मोकळे करुन अधिक मोहक प्रकारे सुशोभीकरणे व नुतनीकरणाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे सावंतवाडी शहरातील प्रसिध्द श्रध्दास्थान असलेल्या प्राचीन मंदिर व तळी यांचे अधिक शैलीदार कलात्मक स्वरुपात सुशोभीकरण तसेच नुतनीकरण या तिर्थक्षेत्र विकासासाठी प्राधान्याने आवश्यक त्या आर्थिक तरतूदीसह मंजूरीने तात्काळ मार्गी लावावी अशी मागणी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केली.सोबत माठेवाडा नवरात्रोत्सव मंडळ अध्यक्ष नंदू गावडे उपस्थित होते.