सावंतवाडी,दि.२० फेब्रुवारी
गिरणी कामगार व वारसदार यांची सभा उद्या बुधवार दि.२१ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता सावंतवाडी शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सभागृहात सालईवाडा पंचायत समिती जवळ होत आहे.
राष्ट्रीय मिल मजदुर संघटनेचे अण्णा शिर्सेकर, सुनील बोरकर उपस्थित राहणार आहेत.
गिरणी कामगार व वारसदार यांनी उपस्थित राहावे, असे जिल्हाध्यक्ष शाम कुंभार यांनी केले आहे.

