मतदारांना दिली शपथ तरुणांनी मतदार नोंदणी करावी -जिल्हाधिकारी किशोर तावडे

सिंधुदुर्ग दि.२० फेब्रुवारी(भगवान लोके)

वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण -तरुणींना मतदानाचा हक्क प्राप्त होतो. १८ वर्षे पूर्ण झाली की मतदाराने आपले नांव मतदार यादीत नोंदणी केल्यावर कायमस्वरूपी त्याचे नाव मतदार यादीत जोडले जाते. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तरुणांनी मतदार यादीत आपले नांव नोंदविण्याचे आवाहन करत जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी उपस्थितांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याची शपथ दिली.

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस, पत्रकार भवन प्रथम वर्धापन दिन आणि पत्रकार पाल्यांचा गुणगौरव सोहळा पत्रकार भवन येथे पार पडला. यावेळी उद्योजक विवेकानंद नाईक, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, माजी अध्यक्ष गजानन नाईक, गणेश जेठे, विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, अण्णा केसरकर, संतोष वायंगणकर, अभिमन्यू लोंढे , अमोल टेमकर आदी उपस्थित होते.