काजू झाडे उध्वस्त करून केले उत्खनन महिलेचे तहसीलदार कार्यालय येथे उपोषण
दोडामार्ग, दि. २० फेब्रुवारी
महसूल यंत्रणा अधिकारी यांना हाताशी धरून दिल्ली येथील ओरजीन कंपनी जैन ही मंडळी सासोली गावातील ग्रामस्थ यांच्या पिढ्यानपिढ्या असलेल्या सामाहीक जमीनी विक्री केली नसताना शिरकाव करून जागा बळकावणे सुरू आहे. ग्रामस्थ यांनी उपोषण आंदोलन करून देखील संपूर्ण महसूल अधिकारी कंपनीच्या दावणीला बांधले गेले आहे यामुळे न्याय मिळत नाही. सासोली येथील वयोवृद्ध महिला रुक्मिणी पिळणकर यांच्या जमीनीत अतिक्रमण करून अनेक वर्षे असलेल्या काजू झाडे उध्वस्त करून नुकसान केले आहे त्यामुळे सदर महिलेने ओरजीन कंपनी जैन यांच्या विरोधात तहसीलदार कार्यालय येथे उपोषणाला सुरूवात केली आहे.