विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ वतीने शिवजयंती उत्सव २०२४ गावभेटी कार्यक्रम

देवगड,दि. २० फेब्रुवारी
अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने, नवीन वर्षाच्या किल्ले विजयदुर्ग दीपोत्सव मध्ये सहभागी होऊन होऊन सहकार्य करणाऱ्या तसेच किल्ले विजयदुर्ग स्वच्छता अभियानात आपल्या संपूर्ण टिमसह सहभागी होऊन १००% योगदान देणारे, देवगड तालुक्यातील प्रसिद्ध शिवप्रेमी मंडळ वरची पुजारेवाडी नाडणच्या शिवप्रतिष्ठान मित्रमंडळासह तरुण उत्कर्ष मंडळ मणचे मुरगवाडी (रजि.),
शिवाजी तरुण मंडळ बाऊळवाडी सौंदाळे,
शिवभक्त उत्साही ग्रामस्थ मंडळ सडेवाघोटण,
श्री काळकाईदेवी क्रिकेट मंडळ कलंबई,
कोठारवाडी विकास मंडळ गिर्ये कोठारवाडी व विजयदुर्गच्या
चौगचारवाडी मित्र मंडळ अशा सात शिवप्रेमी मंडळांना एकाच दिवशी विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी भेट देऊन छत्रपती शिवरायांना वंदन केले.
विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्या उपस्थित सदस्य व पदाधिकारी यांचे गुलाब फुल तर काही ठिकाणी मानाचा फेटा घालुन स्वागत केले, मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत बिडये, मुख्य सल्लागार राजेंद्र परुळेकर यांचा श्रीफळ, शाल देऊन सत्कार करण्यात आला.
शिवजयंती उत्सवानिमित्ताने ठिक ठिकाणी विद्युत रोषणाई तसेच सुंदर अश्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.
शिवजयंती उत्सव २०२४शिवप्रेमी मंडळांना गावभेटी कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष
चंद्रकांत बिडये,
मुख्य सल्लागार राजेंद्र परुळेकर,
सचिव सौ योगिता परुळेकर,
सहसचिव सौ छाया पटेल
कार्याध्यक्ष राजाराम सकपाळ,
उपाध्यक्ष अभिजीत जावकर,
सदस्य विश्वनाथ गडकर,
सदस्य बाळगौरव मणचेकर,
सदस्या कु. गौरी मणचेकर,
कु. पल्लवी कुडवे,
कु. उल्का गिरकर,
कु. प्रणय बिडये,
चंदूमेस्री अनभवणे तसेच सर्व शिवप्रेमी मंडळांचे पदाधिकारी, सदस्य, मान्यवर व्यक्ती, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.