आचरा पोलिसांकडून अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम बाबत जनजागृती

0

जीवनावश्यक खाद्यपदार्थांचे करण्यात आले वाटप

आचरा,दि.१२ जानेवारी

सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग जनजागृती अभियान राबविले जात आहे. कोकणात रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात परप्रांतातून कामगार दाखल होतात काही कामगार शारीरिक थकवा दूर करण्यासाठी विविध कमी किमतीत उपलब्ध होणाऱ्या व्यसनाधीन वास्तुच्या आहारी जातात. अशा कामगारांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आचरा पोलीस दलाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी कामगारांना गोळा करत कमी किमतीत उपलब्ध होणाऱ्या व्यसनानमुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणाम बाबत मार्गदर्शन केले व अशा अंमली पदार्थ व्यसनांच्या आहारी न जाण्याचे आवाहन केले. यावेळी कामगारांना जीवनावश्यक सकस खाद्यपदार्थ देण्यात आले.

यावेळी त्यांच्यासमवेत आचरा उपसरपंच संतोष मिराशी, सामाजिक संस्था प्रतिनिधी अभय भोसले, निलेश सरजोशी, विश्वास गावकर, सचिन हडकर, गुरु कांबळी, पोलिस पाटील विठ्ठल धुरी उपस्थित होते.