म्हाळुंगे तलाठी रमाकांत डगरे ,कृषी सहा यक एस.पी .राठोड यांनी नुकसानीची पंचयादी घातली…
देवगड,दि. २० फेब्रुवारी
तालुक्यातील मौजे महाळुंगे आवळीचे काटे येथील लागलेल्या नैसर्गिक वणव्यात आंबा काजू बागायती ला आग लागून ४ शेतकऱ्यांच्या आंबा बागायतीचे सुमारे १००० हजार आंबा कलमे ,२७०,काजू,२३ माड बागायतीचे सुमारे २४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.या भागात आंबा कलमावर तयार झालेले आंबा काजू पिकाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.
सदरची घटना १८ फेब्रुवारी रोजी १.३० च्या सुमारास घडली .या घटनेसंदर्भात देवगड महसूल प्रशासनाचे म्हाळुंगे तलाठी रमाकांत डगरे ,कृषी सहा यक एस.पी .राठोड यांनी रीतसर नुकसानीची पंचयादी घातली आहे.
पंचयादीत नमूद केल्याप्रमाणे मौजे म्हाळुंगे आवळीचे काटे येथील शेतकरी सूर्यकांत बाबू कदम,केतन विनोद कदम ,मोतीराम बाबू कदम यांच्या आंबा काजू बागायतीमधील ४००,आंबा कलमे,१५० काजू जळल्याने ९.३२.५००/-लाख रु एवढे नुकसान झाले.
श्रीकांत त्रिबक कथले सिद्धांत श्रीकांत कथले यांची ३०० मोठी कलमे व २५० छोटी कलमे जळून सुमारे ९.लाख ४००/-रु,
अजित दत्तात्रय शिर्के सुबोध दत्तात्रय शिर्के यांची बागायतीमधील ११०आंबा कलमे १२० काजू,२३ माड जळून गेल्याने सुमारे रु २.३५ लाख एवढे नुकसान झाले आहे.
त्याचबरोबर प्रशांत जनार्दन पारकर व सौ सिद्धी प्रशांत पारकर यांची १५० मोठी आंबा कलमे जळून गेल्याने सुमारे रु ३ लाख एवढे नुकसान झाले आहे.