आचरा,दि. २० फेब्रुवारी (अर्जुन बापर्डेकर)
पळसंब येथे तीन मार्च ते सात मार्च दरम्यान सरपंच महेश वरक मित्र मंडळा तर्फे सरपंच चषक पळसंब 2024 क्रिकेट स्पर्धा ग्रीन पार्क स्टेडियम वरचीवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. यासाठी प्रथम पारितोषिक रुपये एक लाख व सरपंच चषक, द्वितीय पारितोषिक रुपये 50 हजार व सरपंच चषक ,तृतीय पारितोषिक रुपये 15000 व सरपंच चषक चतुर्थ पारितोषिक रुपये 15000 व सरपंच चषक यासाठी प्रवेश फी रुपये दहा हजार असून सर्वसामाने साखळी पद्धतीने खेळवले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी सुधीर माने 9356402770,अक्षय परब 9405696133 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सरपंच महेश वर्क यांनी केले आहे.