सावंतवाडी,दि.२१ फेब्रुवारी
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे मळगाव इंग्लिश स्कूल येथे ऐतिहासिक चित्रकला आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात शाळेतील बहुसंख्य मुलांनी आवडीने सहभाग घेतला.
स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय, व उत्तेजनार्थ क्रमांक पटकवणाऱ्या मुलांना बक्षीस म्हणूनही ऐतिहासिक चरित्र व पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच कार्यक्रमात इतरही मुलांनी ऐतिहासिक पोवाडे, राष्ट्रभक्तिपर गीते गायली, अफझलखान वधाचा प्रसंग नाटकीय रित्या सादर केला व कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आणली .
तसेच बालवयातील मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून कोणती शिकवण घ्यावी याचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी अभिषेक रेगे यांनी प्रबोधन केले . या कार्यक्रमाच्या अंती शाळेच्या मुख्याध्यापकांचा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून श्री.संभाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार केला व आभारप्रदर्शन केले. छत्रपती श्री शिवरायांच्या आशीर्वादाने मळगाव इंग्लिश स्कुलचे शिक्षक व कर्मचारीवृंद, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी अभिषेक रेगे, संपदा राणे, सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक सुनिल राऊळ,मळगाव इंग्लिश स्कुलचे विद्यार्थीमित्र वर्गाच्या हातभाराने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा उपक्रम राबवण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी अक्षय धुरी, मंगेश पाटील तसेच हिंदू जनजागृती समितीचे सदस्य जीवन केसरकर यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले.
Home आपलं सिंधुदुर्ग श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे मळगाव इंग्लिश स्कूल येथे ऐतिहासिक चित्रकला आणि निबंध स्पर्धा...