सावंतवाडी,दि.२१ फेब्रुवारी
श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या प्रेरणेतुन स्थापन झालेल्या भटवाडी दत्त मंदिर येथे गुरुप्रतिपदे निमित्त रविवार दि. २५ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
यानिमित्ताने सकाळी ८.०० वा. चतुशष्ठी स्नानपूजा व लघुरुद्र अभिषेक, महापूजा,आरती तीर्थप्रसाद,साय. ७.०० वा.डॉ. मंजुषा पाटील कुलकर्णी मुंबई यांच्या शिष्या देवगड येथील सुप्रसिध्द गायीका सौ. राधा जोशी आठल्ये आणि श्री क्षेत्र माणगांव येथील सुप्रसिध्द गायक श्री. सुरेश वाडकर मुंबई यांचे शिष्य श्री. योगेश बोरचाटे ह्यांचा संगित सेवेचा कार्यक्रम होणार आहे. त्यांना तबला- श्री. किशोर सावंत, श्री. निरज भोसले व हार्मोनिअम श्री. निलेश मेस्त्री हे साथ करणार आहेत. निवेदन : श्री. संजय कात्रे हे करणार आहेत.तरी सर्वांनी तीर्थप्रसाद व संगित कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती
श्री विठ्ठल मंदिर व दत्त मंदिर देवस्थान ट्रस्ट व श्री दत्त मंदिर आरती परिवार, भटवाडी-सावंतवाडी यांनी केले आहे.