वेंगुर्ला,दि .२१ फेब्रुवारी
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आणि सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा मठ, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रक्तपेढी सावंतवाडी यांच्या सहकार्याने शनिवार दि. २ मार्च रोजी सकाळी ९ वा. श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय, तुळस येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात रक्ताची गरज लक्षात घेऊन सलग २४ व्या रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे. तरी इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य करावे असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर आणि सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा मठ, तुळसचे मिलिंद शेटकर यांच्यावतीने करण्यात आले आहे. नावनोंदणी महेश राऊळ (९५०५९३३९१२) यांच्याकडे करावी.