श्री सातेरीचा दुसरा जत्रौत्सव २३ रोजी

वेंगुर्ला,दि .२१ फेब्रुवारी

वेंगुर्ला येथील श्री सातेरीचा (बसकीची जत्रा) दुसरा जत्रौत्सव शुक्रवार दि.२३ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त ओटी भरणे तसेच रात्रौ पार्सेकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवाला उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थानतर्फे केले आहे.