शिवाजी महाराजांचा संघर्ष,इतिहास आपल्यासाठी प्रेरणादायी..

असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके ; होम मिनिस्टर स्पर्धेत मृणाली परब विजेत्या

कणकवली दि.२१ फेब्रुवारी

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केल्याने आपण सर्वजण स्वाभिमानाने समाजात वावरत आहोत.त्याकाळात उत्तम प्रशासक आणि लोककल्याणकारी कारभार करत शिवरायांनी संपुर्ण जगासमोर आदर्श निर्माण केला.शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना केलेला संघर्ष आणि इतिहास आपल्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.त्यामुळे आपण सामाजिक स्तरावर काम करताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे वारसदार म्हणून काम करीत राहूयात,असे प्रतिपादन असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांनी केले.

असलदे गावठणवाडी येथे ग्रामविकास मंडळ व शिवसाई मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी सरपंच चंद्रकांत डामरे,नांदगाव सरपंच भाई मोरजकर,उपसरपंच सचिन परब ,व्हॉईस चेअरमन दयानंद हडकर,तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर खोत , पोलीस पाटील सावित्री पाताडे , माजी सरपंच लक्ष्मण लोके , शाखा प्रमुख संजय डगरे , जयराम डामरे, सुरेश मेस्त्री , उदय परब , विजय डामरे, बाळकृष्ण लोके,पत्रकार उत्तम सावंत, ऋषिकेश मोरजकर,अनंत पाताडे,श्री. तांबे,परशूराम परब, बाबाजी शिंदे , शामराव परब , दुर्गेश परब , बापू परब ,मारुती घाडी , मेहुल घाडी , संतोष घाडी , महेश चव्हाण , मधुसुदन परब , दिनेश शिंदे , प्रमोद लोकेसर , जाधव सर , ज्ञानेश्वर घाडी , तुषार घाडी , सतिश पांचाळ ,उदय परब , अनंत परब , दिपेश शिंदे , विश्वनाथ परब , अजय परब , सुभाश परब , नरेंद्र मिठबांवकर , श्रीकृष्ण परब
व ग्रामविकास मंडळ अध्यक्ष समीर परब , सचिव शंकर पाटील , खजिनदार सत्यवान घाडी, सचिव संदीप घाडी पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भगवान लोके म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी किल्यावर झाला. त्यानंतर त्यांनी संघर्षातून स्थापन केलेल्या स्वराज्याचा इतिहास आजही ३५० वर्षानंतर आपल्या समोर आहे.त्यामुळे शिवरायांनी आपल्या सर्व लोकांसमोर ठेवलेल्या इतिहासाचे पाईक होण्याची गरज आहे.आपण सातत्यपूर्वक ही शिवजयंती साजरी करीत आम्हा सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

सरपंच चंद्रकांत डामरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन करत सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेवून एक इतिहास रचला. शिवाजी महाराज यांच्या शिवचरित्रावर लहान मुलांनी आपली भाषणे सादर केली,ही सर्वांना प्रेरणा देणारी आहेत.

माजी सरपंच पंढरी वायगणकर म्हणाले,
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज शिवजयंती आहे.या मंडळाचे कार्यकर्ते शिवजयंती उत्सव सातत्याने साजरा करत आहेत.

शिवजयंती निमित्त शिवाजी महाराज पुतळ्याचे पुजन , महिलांसाठी हळदीकुंकु , फनीगेम्स , होम मिनिस्टर स्पर्धा,लहान १७ मुलांची शिवचरित्र या विषयावर भाषणे सादर करण्यात आली तसेच शिवाजी महाराजांवर पाळणा गीतही सादर करण्यात आले. या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन अनिल परब व समीर परब यांच्या माध्यमातून गौरविण्यात आले. होम मिनिस्टर स्पर्धेत मृणाली मधुसूदन परब प्रथम,अमृता अमोल परब द्वितीय,विनिता मारुती घाडी यांनी तृतीय क्रमांक पटकावला,यांना मान्यवरांच्या हस्ते पैठणी व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले.या स्पर्धेत विजेत्यांसाठी संतोष घाडी यांनी पैठणी तर सरपंच चंद्रकांत डामरे यांनी रोख रक्कम पुरस्कृत केली.भव्य रॅली असलदे गावठणवाडी ते कोळोशी, हडपिड,नांदगाव अशी काढण्यात आली. त्यानंतर वारकरी भजन श्री महादेव प्रसादिक भजन मंडळ शिरवली महादेवाची वाडी, बुवा सागर मोहिते यांनी सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्माराम घाडी बुवा व आभार तातोबा घाडी यांनी मानले.