वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे महास्वच्छता मोहिम

0

वेंगुर्ला,दि.१३ जानेवारी
वेंगुर्ला नगरपरिषदेच्यावतीने १२ जानेवारी रोजी दाभोली नाका ते निमुसगा या रस्त्यावर महास्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

यामध्ये मुख्याधिकारी परितोष कंकाळ, सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान वेंगुर्ल्यातील बैठकीचे बहुसंख्य श्री सदस्य यांनी सहभाग घेत स्वच्छता केली. या मोहिमेत ५०० किलोपेक्षा जास्त प्लॅस्टिक, काचेचा बॉटल व इतर कचरा संकलित करण्यात आला.