कणकवली दि.२१ फेब्रुवारी(भगवान लोके)
सिंधुपुत्र प्रतिष्ठान आयोजित निमंत्रित जिल्हास्तरीय स्तरीय कबड्डी स्पर्धेत “सिंधुचषक २०२४” चा मानकरी यंगस्टार कणकवली ठरला.तर पंचक्रोशी फोंडा संघाला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले.
सिंधुदुर्ग जिल्हा आयोजक व कबड्डी खेळाडू संघटना व कणकवली तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सिंधुचषक २०२४ स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत १६ संघांना प्रवेश देण्यात आला होता.या स्पर्धेचे उद्घाटन सरपंच गुरुनाथ आचरेकर,दाजी राणे,पोलिस पाटील संजय गोरूले, कासार्डे पोलिस चंद्रकांत झोरे,पी.डी.कदम,डॉ.पुरळकर, कृष्णा कदम, सुचिता पोकळे,मिनाक्षी जाधव,छोटू खोत, उत्तम सावंत,विशाल कदम, रामचंद्र जाधव,दिपक चव्हाण,राजा साटम,मंदार राणे व अनेक कबड्डी प्रेमींच्य उपस्थितीत संपन्न झाला.
या स्पर्धेत अतिशय अटीतटीच्या लढती झाल्या.यामधून यंगस्टार कणकवली, पंचक्रोशी फोंडा, लक्ष्मीनारायण वालावल यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय,तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकावला.तर स्पर्धेत अष्टपैलू खेळाडू अमित चव्हाण, उत्कृष्ट चढाई सुमीत गावडे, उत्कृष्ट पकड अमित इंदप यांनाही रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले.तर प्रत्येक सहभागी संघांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेत पंच म्हणून वसिम शेख, कोरगावकर मॅडम, भूपेश राणे, विशाल पारकर, महेश जाधव यांनी काम पाहिले.स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सिंधुपुत्र प्रतिष्ठान कोळोशीच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.