१५ संघांनी घेतला होता सहभाग ; शिवजयंती निमित्त विविध स्पर्धा संपन्न
कणकवली दि. २१ फेब्रुवारी ( भगवान लोके )
सकल मराठा समाज कणकवली आयोजित शिवजयंती उत्सव २०२४ निमित्त राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम चिपळूणकर ग्रुप – ढोल नाच ठाणे – पालघर , द्वितीय क्रमांक वाय के ग्रुप – देवल्याण नाच – गोवा , एस. के. कलामंच डांगी – डांग गुजरात , तृतीय क्रमांक सिध्दाई डान्स क्रियेशन – कोळी नृत्य – महाराष्ट्र , कला सार्थक देवल्यान नाच – गोवा , उत्तेजनार्थ – एस.पी.के. सावंतवाडी – ओपणा केरळ , अष्टपैलू युवा पावरा नाच – नंदुरबार अनुक्रमे विजेते ठरले . या लोकनृत्य विजेत्या संघांना प्रथम २१ हजार , द्वितीय १५ हजार विभागून , तृतीय ११ हजार विभागून , उत्तेजनार्थ प्रत्येकी ५ हजार आणि सन्मानचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या लोकनृत्य स्पर्धेत द चिपळूनकर ग्रुप , चिपळून , परी डान्स क्रिएशन्स कुडाळ ( होळी कोळीनृत्य ), एस.के. डान्स अकॅडमी कणकवली ( धनगर नृत्य ) , एन. के. कलामंच निवळी रत्नागिरी, वाय. के. ग्रुप चिपळून , बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम हायस्कूल , कणकवली ( घुमर राजस्थानी) , वराडकर हायस्कूल , कट्टा ( गोंडी डान्स ) , लिंग रवळनाथ भगवती महिला लोकनृत्य मंडळ , पोखरण गोफनृत्य , अष्टपैलू युवा निकेतन मालवण ( पावरा नृत्य ) , ८ काऊंटस ग्रुप – चिपळून , पोदार हायस्कुल कणकवली ( बांबू डान्स – मिझोरम ) , कला सार्थ ग्रुप रत्नागिरी , सिद्धाई डान्स अकॅडमी कुडाळ ( कोळी नृत्य ) , वी ग्रुप कुडाळ , एस.के.पी. सावंतवाडी या पंधरा संघांनी सहभाग घेत लोकनृत्य सादर केली. या स्पर्धेचे परीक्षण लक्ष्मण पडवळ,संजय पेटकर यांनी केले.
यावेळी मराठा समाजाचे भाई परब,महेंद्र सांबरेकर, सोनु सावंत, बच्चु प्रभुगावकर, सुशील सावंत, बबलू सावंत, समीर सावंत, संदीप राणे,महेश सावंत, शेखर राणे,तेजस राणे,औदुंबर राणे,विनोद सावंत,महेंद्र गावकर ,अभय राणे , व्यंकटेश सावंत, समीर सावंत, संतोष परब यांच्यासह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.