आवश्यक पुरावे दिलेल्या असताना सुध्दा सावंतवाडी पोलिसांनी कोणतीही दखल न घेता उलट त्या कंपनीला क्लीन चिट-माजी मंत्री प्रविण भोसले व अर्चना घारे-परब

 सावंतवाडी,दि.२१ फेब्रुवारी
वित्तीय कंपनीच्या फसवणूकी विरोधात आम्ही तक्रारी तसेच आवश्यक पुरावे दिलेल्या असताना सुध्दा सावंतवाडी पोलिसांनी कोणतीही दखल न घेता उलट त्या कंपनीला क्लीन चिट दिली त्यामुळेच अनेकांची फसवणूक झाली असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी मंत्री प्रविण भोसले व अर्चना घारे-परब यांच्याकडून आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला.तसेच या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सत्तेतील मोठ्या नेत्यांचे नाव घेऊन पैसे जमा केलयाचा आरोप ही त्यांनी केला आहे.
यावेळी पुंडलिक दळवी अॅड. सायली दुभाषी,सावली पाटकर हितायततुल्ला खान आदी उपस्थित होते.
सावंतवाडीत एका एटरप्रायझेसच्या नावाखाली वित्तीय कंपनीचे कार्यालय थाटून अनेकांची फसवणूक करणार्‍या कंपनीन पळून गेली आहे.या पार्श्वभूमीवर घारे यांनी याला जबाबदार पोलिस यंत्रणेला ठरवले आहे.वित्तीय संस्थेचे दुकान थाटलेल्या कंपनीने अनेकांना गंडा घातला आहे हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रथमच त्यांना राष्ट्रवादीच्या माध्यमातून रोखण्यात आले होते तसेच या कंपनीची चौकशी करा अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली होती.
मात्र पोलिसांनी कोणतीही भूमिका न घेतल्यामुळेच पुढील ग्राहकांची फसवणूक झाली केवळ पोलिसांनी क्लिन चिट दिल्याने हा आर्थिक कट करणे साध्य झाले त्यामुळे या प्रकरणी सीआयडी चौकशी करावी अशी मागणी न्यायालयात करणार आहोत असे ही त्यांनी सांगितले
यावेळी भोसले म्हणाले, या ठीकाणी चुकीची पध्दत वापरुन तसेच आमीष दाखवून कंपनीच्या अधिकार्‍यांनी ग्राहकांची व अपंगाची फसवणूक केली आहे झालेला प्रकार योग्य नाही याबाबत आम्ही नक्कीच दाद मागणार आहोत काही झाले तरी ग्राहकांची •फसवणूक होणार नाही यासाठी आमचा पाठपुरावा सुरू राहणार आहे