जामसंडे येथील घाटे पेट्रोल पंप नजीक आगीचे तांडव

नगरपंचायतीच्या अग्निशामबंबाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

देवगड,दि.२१ फेब्रुवारी

जामसंडे येथील घाटे पेट्रोल पंप नजीक दुपारी 3:45 वाजता अचानक लागलेल्या आगीमुळे नगरपंचायत कर्मचाऱ्यांसह आजूबाजूच्या नागरिकांची धावपळ उडाली घटनेची माहिती मिळतात नगरपंचायतीचा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले घटनेची माहिती मिळताच देवगड जामसंडे नगरपंचायतीचे नगरसेवक विशाल मांजरेकर घटनास्थळी धाव घेत नगरपंचायत कर्मचाऱ्यांसह आगीवर नियंत्रण मिळवण्यास शर्तीचे प्रयत्न केले. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले यावेळी नगरपंचायत कर्मचारी मंदार घाडी, कुंदन घाडी,उत्तम जाधव, विशाल देवगडकर तसेच स्थानिक ग्रामस्थांनी आग विझवण्यास शर्तीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळविले यावेळी जामसंडे तलाठी संतोष डांगे देखील उपस्थित होते