कणकवली दि.२१ फेब्रुवारी(भगवान लोके)
दिविजा वृध्दाश्रम असलदे येथे दिनांक 19 फेब्रुवारी रोजी दरवर्षी प्रमाणे यावर्षी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
दिविजा वृद्धश्रमातील आजी आजोबांचा हस्ते दीप प्रज्वलन करून शिवाजी महाराज यांचा मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय ,जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा देत वातावरण शिवमय केले.
आजी आजोबांनी हातामध्ये झेंडे घेऊन जय जय महाराष्ट्र माझा ‘ हे गीत अगदी मोठ्या आवाजात व चेहऱ्यावर हास्य व हावभाव ठेऊन हे गीत सादर केले व वातावरण प्रफुल्लीत केले.तसेच आश्रमातील कर्मचारी वर्गाने सामूहिक नृत्य सादर करून आजी आजोबांचे मनोरंजन केले व कार्यक्रमाची सांगता केली.