आगळा वेगळा शिवजन्म सोहळा
वेंगुर्ला,दि.२१ फेब्रुवारी
राणी लक्ष्मीबाई कन्याशाळा वेंगुर्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394 व्या जयंतीचे औचित्य साधून शिक्षक आणि पालक यांचे संकल्पनेतून एक आगळा वेगळा शिवजन्म सोहळा संपन्न झाला.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.विवेकानंद आरोलकर यांचे अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
सर्व प्रथम विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रसंग सवेश सादर केले.सर्व माता पालकांनी जिजाऊंच्या वेशभूषेत आणि मुलींनी पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा हे पाळणा गीत म्हणून शिवजन्म सोहळा संपन्न केला. खास आकर्षण म्हणजे याच पाळणा गीतावर मुलींनी सुंदर नृत्य सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ,माता पालक संघ, शाळेचा शिक्षक वृंद , अंगणवाडी कर्मचारी आणि ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.