सिधुदुर्गातील पडद्यामागील कलाकारांचा सन्मान

0

वेंगुर्ला,दि.१३ जानेवारी
वेंगुर्ला येथे सुरू असलेल्या स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती खुल्या एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने नाट्य चळवळीत महत्त्वाचे योगदान दिलेल्या जिल्ह्यातील पडद्यामागील कलाकारांचा सन्मान १२ जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. नाटकांमध्ये कलाकारांसोबतच महत्त्वाची भूमिका बजावणा-या ‘बॅकस्टेज‘ कलाकारांचा गौरव केल्याबद्दल गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री रमाकांत खलप यांनी कलावलयचे कौतुक केले.

यामध्ये भानुदास मांजरेकर, विष्णू वायंगणकर, संजय राऊळ (वेंगुर्ला), विलास मयेकर (उभादांडा), दादा हळदणकर (दाभोली), अशोक कुडाळकर, हेमंत वर्दम (कुडाळ), सुभाष कुमठेकर, सुधीर कद्रेकर (मालवण), रामचंद्र आर्डेकर, संजय राणे (कणकवली), अमोल आरोसकर (सावंतवाडी), आनंद नानचे (परूळे) यांचा तसेच तसेच वेंगुर्ला येथे प्रथमच ६२व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल ‘माझा वेंगुर्ला‘ या संस्थेचाही समावेश आहे.

या सर्वांना माजी केंद्रीय मंत्री तथा गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री रमाकांत खलप, सिधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन वालावलकर, बी.के.सी.असोसिएशनचे अध्यक्ष सतिश डुबळे, परिक्षक आनंद म्हस्वेकर, कलावलय संस्थेचे पदाधिकारी सुरेंद्र खामकर, संजय पुनाळेकर, दिगंबर नाईक, सुनिल रेडकर यांच्या हस्ते शाल व सन्मानचिन्ह देण्यात आले. यावेळी वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ व कलावलय संस्थेचे पदाधिकारी व बहुसंख्य नाट्यरसिक उपस्थित होते.